राकॉपा मूर्तिजापूर तालुका व शहरच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी/मूर्तिजापूर
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनास बसलेल्या महिला खेळाडूंवर झालेल्या अन्याय अत्याचाराची केंद्र सरकारने दखल घ्यावी, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई देण्यासाठी आज मूर्तिजापूर उपविभागीय कार्यालयावर राकॉपा मूर्तिजापूर तालुका व शहरच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
देशाच्या महिला कुस्तीपटू यांच्यावर झालेल्या अत्याचाराची शासनाने अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही व आरोपी विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला नाही ही कृती लोकशाहीला अत्यंत घातक असून संबधित खासदार ब्रीजभूषणसिंग खुलेआम बाहेर फिरत असून ज्या खेडाळूनी देशासाठी फार मोठे मेडल मिळवले असून त्याच्यासोबत एखाद्या आतंकी सारखी वागणूक मिळत आहे. त्याकरिता संबधित खासदार ब्रीजभूषणसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करावा व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप प्रमाणात नुकसान झाले होते.
सोयाबीन पिकाची आणेवारी खूप कमी असून सुद्धा पीकविमा व नुकसान भरपाई मिळाली नाही तरी आणेवारी व नुकसान याचा विचार करता शेतकऱ्यांचे त्यांचा हक्काचा पीकविमा व नुकसान भरपाई त्वरित मिळावी या मागणी साठी राकॉपा मूर्तिजापूर तालुका व शहरच्या वतीने दि.२९ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश संघटक सचिव रवि राठी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर गावंडे, मा.अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष निजामभाई इंजिनियर,जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिमभाई घानीवाले,नासिर भाई, तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, शहरध्यक्ष राम कोरडे,पुनम मार्कंड,रंजना सदार,दिपाली देशमुख,बबलू वानखडे, अमोल वडतकर,सईफुद्दिन,अमोल लोकरे,रवी मार्कंड, प्रवीण इंगळे,दामोधर जिचकार, वैभव देशमुख,विशाल शिरभाते, विष्णू लोडम,मन्सूर राही,अभी बाजड,विजय बरडे,अझहर शेख,आनंद पवार,सागर निचळ, तुषार दाभाडे,नितेश गुंजाळ, दिपराजन बैतलवार, निखिल ठाकरे,सुनिल धांडे,अक्षय मालोदे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.