मूर्तिजापूर : तालुक्याच्या शेजारी असलेले गाव सोनाळा परसोडा कडे जाणारा महामार्गावरून मध्याभागमधून (मीडियनं ओपनिंग) रस्ता करून देण्यात यावे. यासाठी सोनाला परसोडा परीसरातील शेतकर्यांनी मागणी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नॅशनल हायवे विभागाला विनंती अर्ज सादर केले आहे.
नॅशनल हायवे चौपदरीकरणाच्या कामाला अंतिम टप्प्यात चे स्वरूप आले असून महामार्गावर मुर्तिजापूर शहरातून सोनाळा परसोळा कडे शेतकऱ्यांना शेतीसाठी जाण्याकरिता चौपदरीकरण रस्त्याच्या मध्यभागी असलेले डिव्हायडर मधून कोणत्याच प्रकारचे ये जा करण्याकरिता मार्ग उपलब्ध करून दिलेला नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्याच कारणाने आज इथे संपूर्ण ग्रामस्थ व शहरातील शेतकरी बांधव नॅशनल हायवे विभागाला विनंती अर्ज सादर करण्याकरिता मोठ्या जमावाने नॅशनल हायवे महामार्गावर जमले होते शेतकऱ्यांना शेती करिता तसेच शेतमाला करिता कृषी उत्पन्न बाजार समिती कडे जाण्याकरिता मार्ग हा सोनाळा फाट्यावर मिळावा या मागणीला प्रतिसाद मिळावा याकरिता आमदार श्री वसंत खंडेलवाल आमदार विधान परिषद यांना साकडे घातले तसेच नॅशनल हायवे विभागाने व शासन प्रशासनाने या गंभीर बाबीवर लक्ष देऊन नॅशनल हायवे मधून सोनाळा परसोडा व आसरा मार्गा कडे ये जा होणाऱ्या मार्गाला ग्रामीण वर्ग व शेतकऱ्यांसाठी ही सुविधा करून देण्यात यावी.
याप्रसंगी मूर्तिजापूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष सुनील महादेव पवार सुहास खांडेकर दिगंबर गुल्हाने गुणवंतराव महल्ले नैजोउद्दिन मोहम्मद जावेद वहीब सनाउल्ला खान अमोल आंबूलकर राजकुमार प्रजापति फिरोज खान विजय प्रजापती सुरज प्रजापती मोहम्मद सोहेल प्रकाश भगत रामेश्वर पाटील खराब खरबडी सोनाळा वाजिद खान शामसुंदर तिवारी सुरेश गुल्हाने तसेच असंख्य शेतकरी यांनी आपल्या सह्यानिशी निवेदन नॅशनल हायवे विभागाचे प्रमुख श्री ढगे साहेब यांच्या नावे देण्यात आले. विशेष म्हणजे सोनाळा-परसोडा हे आमदार हरीश पिंपळे याचं गाव आहे.