मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट मोठ्या प्रमाणात तयारीला लागला असून आतापर्यंत दोन उमेदवार पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी मोर्चे बांधणी करीत होते. त्यासाठी एका उमेदवाराने लाखों रुपये खर्च केले असून ते वाया गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. तर आता आणखी एक उमेदवार मतदार संघात सक्रिय होणार असल्याने आज त्यांचे मुंबईतील फोटो पाहून भावी आमदारांची झोप उडाली आहे.
मतदारसंघातील भोळ्या भाबळ्या जनतेला पैशाचे आमिष दाखवून त्यांना मोठी मोठी स्वप्ने दाखवून काही भावी आमदार गंडवत असल्याचे निदर्शनास आले आहे, ते स्वतःला तुमचे अतिजवळचे असल्याचे असे भासवत असले तरी त्यांचा हेतू अनेक कार्यकर्त्यांच्या लक्षात आला आहे. म्हणूनच जवळचे कार्यकर्ते दूर गेले आणि ते भावी आमदार खोटा असल्याची जाहिराती करू लागले. तरी त्यांचे आजूबाजूचे संधीसाधू मार्गदर्शक काहीच होत नसल्याचे त्या भावी आमदाराला पटवून देत आहे. मात्र आता काही केल्याने त्या उंचीपर्यंत त्या भावी आमदाराला पोहचणे कठीण असून त्यात आणखी एकाने उडी घेतल्याने त्या भावी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
आता राष्ट्रवादीचे दोन नव्हे तर तीन भावी आमदार सक्रिय झाले आहे. तसे रांगेत आणखी दोन चार आहेत पण निवडणुकीपूर्वी खर्च, भेटीगाठी घेणे यासाठी भावी आमदारांचा गेल्यावर्षभरापासून वारेमाप खर्च सुरू आहे. तर आता सक्रिय होणारे भावी आमदार तुमच्या चांगलेच परिचयाचे, मुंबईतील नामवंत बिल्डर असल्याने त्याच्यापुढं या बाकीच्यांचा निभाव लागणार नसल्याचे अनेकांचं म्हणणे आहे. 2014 च्या निवडणुकीत एका पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, यांच्या पाठीमागे पदाधिकाऱ्यांची मोठी टीम आहे. 2014 च्या निवडणुकीत जेव्हा देशात भाजपची लाट होती तेव्हा त्यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला होता. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा त्यांना मिळणार आहे का?, मात्र यावेळी पक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) असणार आहे. हे भावी आमदार सर्वच बाबतीत सक्षम असून त्यांच्या मतदारसंघात सक्रिय झाल्याने पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे पक्षाचे एक पदाधिकारी सांगत आहे.