Saturday, December 21, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | डॉ.अन्सार यांना उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी सम्मान पत्र...

मूर्तिजापूर | डॉ.अन्सार यांना उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी सम्मान पत्र…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

मूर्तिजापूर पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी डॉ नासिरोददीन अन्सार यांनी शैक्षणिक सत्र 2023 _2024 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला तर्फे उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी अधिकारी च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दिनांक 27/6/2024 रोजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद अकोला यांच्या दालनात आयोजित एका भव्य कार्यक्रमात डॉ अन्सार यांना उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी च्या सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती मा. मायाताई नाईक मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री रत्नसिंग पवार,

शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी योजना , शिक्षण समिती सदस्य श्री रामभाऊ गव्हाणकर, सफुरतीताई गावंडे, श्रीमती दांदडे ,श्री सुशांत बोर्डे, श्री प्रमोद फाळके, प्रशासन अधिकारी श्री. बननोरे, श्री जानोरकर, जिल्हा क्रिडा अधिकारी, गटशिक्षणाधिकारी श्री राऊत, श्री सुर्यवंशी, श्री दोतांडे, महेर मॅडम, श्रीमती रामटेके, सर्व विस्तार अधिकारी, सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, समाजसेवक श्री संजय नाईक, श्री कावरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षणाधिकारी श्री राठोड यांनी केले. श्री. श्याम राऊत गटशिक्षणाधिकारी अकोला यांनी डॉ अन्सार च्या जीवन व व्यक्तित्वावर सखोल माहिती दिली. आभार श्री राठोड यांनी मानले. या प्रसंगी सर्व उपस्थितांनी डॉ अन्सार यांना शुभेच्छा दिल्या. डॉ अन्सार यांनी सत्कार पर उत्तरात सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: