मूर्तिजापूर – क्रिडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,थाई बाॅक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच विभागीय स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा, तालुका क्रीडा संकुल मूर्तिजापूर येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत अमरावती विभागातील शालेय विद्यार्थी १७ व १९ वयोगटातील मुले व मुली खेळाडू सहभागी झाले होते,
प्रसंगी या स्पर्धेचे उद्घाटन निवासी वसतिगृह शाळा मुख्याध्यापिका एल .आर.बन्सोड मॅडम, प्रमुख उपस्थिती संतोष भांडे, प्रशांत शहाकार, अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतिष चंद्र भट क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे अमरावती विभागीय थाई बाॅक्सिग विभाग प्रमुख गंगाधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संयोजक विनोद काळपांडे, थाई बाॅक्सिग स्पर्धा पंच संजय तायडे, उमेश साखरे, ऋषिकेश धुळे, चैतन्य शिंगने, धनराज पंडित यांनी सहकार्य केले,
शालेय थाई बाॅक्सिग स्पर्धेत अमरावती विभागातील विविध शाळेचे खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते, खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त करून त्यांची शालेय थाई बाॅक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली, अमरावती विभागातील खेळाडू राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करती