मूर्तिजापूर – क्रिडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,थाई बाॅक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच शालेय क्रीडा स्पर्धा, तालुका क्रीडा संकुल मुर्तिजापूर येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी वयोगट १७ व १९ वयोगटातील मुले व मुली खेळाडू सहभागी झाले होते,
अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतिष चंद्र भट क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे अमरावती विभागीय थाई बाॅक्सिग विभाग प्रमुख गंगाधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संयोजक विनोद काळपांडे, थाई बाॅक्सिग स्पर्धा पंच संजय तायडे, सहयोगी क्रीडा शिक्षक संतोष भांडे,पियुष सोळंके, राजेश बगाडे यांनी सहकार्य केले.
स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेचे खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते, खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त करून त्यांची शालेय थाई बाॅक्सिंग स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झाली, अकोला जिल्ह्यातील खेळाडू विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व करतील
या स्पर्धेत भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा, मुलांची निवासी शाळा शेलुवेताळ, स्व परमानंद मालानी स्कूल मुर्तिजापूर,
माउंट कारमेल स्कूल बोरगांव मंजू, लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल मुर्तिजापूर, इंटरनॅशनल स्कूल मुर्तिजापूर, मुर्तिजापूर हायस्कूल मुर्तिजापूर, उज्ज्वल पब्लिक स्कूल बोरगांव मंजू, शांती निकेतन स्कूल मुर्तिजापूर, बबन चौधरी कनिष्ठ महाविद्यालयीन ब्रम्ही, आदी शाळेतील खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले होते,