Monday, December 23, 2024
Homeकृषीमूर्तिजापूर | भगोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकांची धुळीमुळे नासाडी…रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या माल वाहतूक...

मूर्तिजापूर | भगोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकांची धुळीमुळे नासाडी…रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या माल वाहतूक टिप्परने शेतकरी त्रस्त…पहा काय म्हणतात शेतकरी…

अनभोरा ते भगोरा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ठेकेदारांची टिप्परने क्रस्ट वाळू ,गीट्टी, मुरूम,इत्यादीची वाहतूक होते, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे अतिशय नुकसान होते. त्यांच्या पिकांवर सारी धूळ जाऊन बसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करूनही मस्तवाल ठेकेदार त्यांना धमकावत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रमाणापेक्षा जास्त माल टिप्परमधे भरल्याने रस्त्यावर पण अधिक भार पडत आहे. त्यामुळे अवस्था खराब होत आहे.

याचबरोबर नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यात खड्डे अधिक झाल्याने प्रवास करणे गैरसोयीचे झालेले आहे.त्या रस्त्याने शहरी भागात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा प्रवास करतांना अधिक त्रास होत आहे. विशेष म्हणजे रॉयल्टी ही सायंकाळी 5.00.वाजेपर्यंत असताना त्याच्या नंतरही सर्रास माल‌ वाहतूक होत आहे. या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष्य असल्याचे तेथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी म्हणणे आहे. तर यावरच शेतकर्यांसोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अर्जुन बलखंडे यांनी…काय म्हणाले शेतकरी पाहूया…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: