विधानसभा निवडणुकीला जेमतेम वर्षे बाकी राहिल्याने मूर्तिजापूर संघाचा आमदार होण्याची ‘खाज’ लागली आहे. या मतदार संघात आता अनेक नवीन चेहरे समाज सेवक म्हणून उदयास आले. खऱ्या अर्थाने ज्यांना कोणी ओळखतही नाही अशा लोकांनी या मतदारसंघात विविध शिबिरे, उपक्रम राबवत आपली दुकानदारी सुरु केली आहे.
विशेष म्हणजे पैशाच्या जोरावर येथील प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन प्रसिद्धी मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा ही मंडळी करीत आहे, वास्तविक यांना या मतदारसंघात कोणीच ओळखत नाही, पैशाच्या ताकदीवर कार्यकर्ते विकत घेण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.
निवडणुकीला किमान एक वर्ष वेळ असेल तेव्हाच हे प्रकट होतात. असे लोक पैशाने इतर लोकांना हाताखाली घेतात, ज्यांना घरातच काय बाहेरही कुत्र विचारत नाही, पण भावी आमदाराला असं भासवतात की पूर्ण मतदार संघात आपली ओळख आहे. यंदाही असेच लोक आपल्या शहरात प्रकट झालेत, त्याआधी कार्यकर्ते तयार केलेत, कार्यकर्त्यांच्यामते शहरात जर एन्ट्री करायची त्याआधी एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो. शहरात होर्डिंग लावले जातात मोठा गाजावाजा केला जातो, त्यासाठी सत्कार मेळावे साजरे केले जातात, लोकांना आमंत्रित केल्या जाते तेथे त्यांची एन्ट्री होते. तेव्हा उपस्थित लोक त्यांच्या खिश्याचा बजेट लावून घेतात आणि तो किती खर्च करू शकतो, तो किती कामाचा आहे किंवा नाही यांचाही अंदाज बरोबर लावतात.
खरंतर मूर्तिजापूरकर जनतेसमोर कोणी कितीही शायनिंग मारली किंवा मी मोठा समाज सेवक असल्याचा आव आणल्या जातो. परंतू जनता मूर्ख नाही सर्व समजते, आता ज्याला निवडून द्यायचे त्यालाच निवडून देतील. कारण इतके वर्षात जे मूर्तिजापूरकरांनी झेलले ते कोणत्याही शहरातील जनतेने झेलले नाही. त्यामुळे जो जनतेच्या कामाचा तोच निवडून येईल. लादलेला, पैसेवाला, अश्या नकली समाज सेवकाला घरचा रस्ता दाखवतील हे निश्चित.
गेल्या 14 वर्षात मतदारसंघाचा काय विकास झाला? हे लोकांच्या तोंडुनच ऐकायला बरे वाटेल, मतदारसंघातील जनतेने विकास काय असतो, तेव्हाच बघितला जेव्हा तुकारामभाऊ बिरकड आमदार होते, तुकाराम भाऊचा तेव्हा द्वेष करणारे आता त्यांचं नाव घेतात. जनतेला तुमच्या संपत्तीचे काही देणंघेणं नसते, त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे कारण आपण त्यासाठीच ते प्रतिनिधी निवडून देतात. मूर्तिजापूरकर अश्याच उमेदवाराच्या शोधात आहेत जो तुकारामभाऊ सारखे काम करेल. यासाठी महाव्हाईस न्यूज मतदारसंघातील प्रत्येक भावी उमेदवाराची कुंडली तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे काम करणारच आहे.