मूर्तिजापूर शहरातील तिडके नगरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कुंटणखान्यावर शहर पोलिसांनी धाड टाकली असता दोन मुलीसह चार युवकास पकडण्यात आले. तर कुंटणखाना चालविणाऱ्या तरुणाची पोलिसांनी त्याच्या घरापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढल्याची माहिती मिळाली आहे. २८ वर्षीय युवक शुभम जगन्नाथ ठोकळ हा स्वतःच्या घरातच नको तो व्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती सिटी पोलिसांना मिळाल्यावरून काल दुपारी ३.३० वाजेदरम्यान धाड टाकली असता, दोन मुलीसह चार युवक घरात आढळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांना मिळालेला गुप्त माहितीवरुन हेड पोलिस कॉन्स्टेबल अनिल राठोड, सुरेश पांडे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्निल खाडे, सुनील व महिला कॉन्स्टेबल पूजा भोकरे यांनी कॉन्स्टेबल पूजा भोकरे यांनी उच्चभ्रू असलेल्या तिडके नगर येथील शुभम जगन्नाथ ठोकळ याच्या घरात धाड टाकली असता, त्या ठिकाणी दोन मुलीसह चार युवक सापडल्याने त्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मात्र या धाडीत सापडलेल्या २ मुलींना समज देऊन सोडण्यात आले तर शुभम जगन्नाथ ठोकळ (२८) रा. तिडके नगर, पवन त्र्यंबक बोळे (२३) रा. हातगाव, प्रज्वल सुनील अनभोरे (१९) रा. शेलूवेताळ, चेतन गणेश कोलवळे (१८) रा. अनभोरा यांच्या विरूद्ध सिटी पोलिस ठाण्यात कलम ११०, ११७ मुंबई पोलिस कायद्यानुसार नोंद करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे.