Thursday, December 26, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | गाय चोरीला गेली म्हणून चक्क ! पोलीस अधीक्षकांकडे तक्रार...

मूर्तिजापूर | गाय चोरीला गेली म्हणून चक्क ! पोलीस अधीक्षकांकडे तक्रार…

मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरातील रहेमत नगर या भागातील गाय गोठ्यातून चोरी गेल्याने तक्रारदाराने चक्क अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. गोठातून गाय चोरी झाल्याची घटना 23 नोव्हेंबर रोजी घडली आहे. विशेष म्हणजे सर्वप्रथम तक्रारदार चोरीची तक्रार घेवून शहर पोलीस ठाण्यात गेले असता ठाण्यातील पोलीस कर्मचार्याने त्याला हाकलून लावल्याचे सांगितले आहे.

नासिर खान यांनी दिलेल्या तक्रार नमूद केले आहे की 23 नोव्हेंबर रात्रीच्या दरम्यान गाईच्या कोट्याजवळ दोन अज्ञात व्यक्ती फिरत होते अशी चर्चा सकाळी गायी चोरी गेल्यावर होत होती रात्री हे दो अनोळखी का फिरत होते यावर संशय व्यक्त केला जात असून त्यांच्या तोंडाला कपडा बांधल्यामुळे ओळख पडली नाही. 23 नोव्हेंबर पासून आज पर्यंत गाईचा शोध घेतला असता गाय आढळून आलेली नाही.

सदर गाईला लहानपणा पासून ते मोठी होईपर्यंत तिचे पालन पोषण तक्रारदाराने केले होते. आजच्या तारखेत सदर गायची किंमत अंदाजे प्रमाणे साठ हजार रुपये आहे अज्ञात चोरट्यांनी सहिवाल जातीची गाय लंपास केली आहे. या संदर्भात नासिर खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कडे लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: