राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख अद्यापही निश्चित नसली तरी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आतापासून रंगत वाढली आहे. गेल्या तिन्ही निवडणुकीत भाजपचे हरीश पिंपळे यांनी बाजी मारली असली तरी मात्र या निवडणुकीत भाजपाकडून बरेच फेरबदल पाहायला मिळणार आहेत. कारण जिल्ह्याचा ग्राउंड रिपोर्ट हा भाजपासाठी धोकादायक असणार आहे. यावेळेस भाजप कोणता उमेदवार देणार हे सांगणे कठीण आहे.
मात्र त्यापूर्वीच सम्राट डोंगरदिवे यांनी मतदार संघातील इतर भावी आमदारांना कामाला लावत दमदार इन्ट्री केली आहे. आमदारकीचे स्वप्न बघणारे काही जण कोमात गेल्याचे दिसून येते एवढंच काय तर एका भावी आमदारकडे एक सल्लागार सोडून एकही कार्यकर्ता नाही. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो स्वतःच टाकायची वेळ आली आहे. तर दुसरीकडे 14 वर्षात पहिल्यांदा पत्रकारांना ओली पार्टी देणारे आमदार यांनाही धाकधूक लागली आहे. आमदार साहेबांचे दोन सल्लागार इतर कार्यकर्त्यांना भाऊ जवळ जाऊच देत नसल्याचे समजते. आमच्याशिवाय भाऊच पत्तच हालत नसल्याचं ते इतर कार्यकर्त्यांना भासवतात त्यामुळेच भाऊचा कार्यकर्ता तुटून गेला आहे. तरी मात्र त्यांच्याकडे अनेकांना जोडण्याची संधी अजून उपलब्ध आहेत.
तर सम्राट डोंगरदिवे यांनी भाजपच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना जवळ केल्याच समजते, भाऊ पासून तुटलेले अनेक कार्यकर्ते सम्राट भाऊ सोबत जुळवून घेण्यासाठी तयारीत आहेत. सोबतच राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सम्राट डोंगरदिवे यांची दावेदारी सध्यातरी निश्चित दिसत असली तरी त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भावी आमदार आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यात कितपत यशस्वी होणार हे येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत सम्राट भाऊ खूप पुढे निघून जातील असा राजकीय जाणकारांच म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीला सोडणार, जर वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामील झाले तर हा मतदारसंघ वंचित मागू शकते, मात्र तसे चिन्ह सध्या दिसत नाही. राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार त्याआधी सर्व्ह नक्की करणार आणि त्यात पहिला क्रमांक सम्राट यांचा असणार आहे असे अनेक कार्यकर्ते सांगत आहे.