Sunday, December 22, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | पेट्रोल पंपाच्या संचालकावर प्राण घातक हल्ला करून रोख रक्कम घेऊन...

मूर्तिजापूर | पेट्रोल पंपाच्या संचालकावर प्राण घातक हल्ला करून रोख रक्कम घेऊन हल्लेखोर फरार..!

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदू स्मशानभूमी नजीक शुक्रवारी रात्री तीन हल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडून डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाचे संचालक दिनेश बुब यांना अज्ञात तीन हल्लेखोरांनी मूर्तिजापूर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंदू स्मशानभूमी नजिक त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून लुटल्याची गांभीर्य जनक घटना शुक्रवारी रात्री ८.३० ते ८.४५ दरम्यान घडली आहे. या हल्ल्यात दिनेश बुब हे गंभीर जखमी झाले आहे.

नेहमी प्रमाणे दिनेश बुब हे आपल्या नायरा पेट्रोल पंप येथून दिवस भराचा हिशोब संपून पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन आपल्या कार ने घरी जात असतांना त्यांच्या पेट्रोल पंप नजीक असलेल्या हिंदू स्मशानभूमी जवळ अज्ञात तीन युवकांनी गाडीवर लाठीने वार करून गाडी अडवली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला, यावर दिनेश बुब यांनी अडवणूक केली असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्यांच्या जवळील रक्कम लुटून फरार झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात व्यापाऱ्यास लुटण्याची ही तिसरी घटना असून गेल्या दोन दिसांपूर्वी शहरातील स्टेशन विभाग परिसरातीतून भर दिवसा मार्केट मधून दुचाकी चोरीचीही घटना घडली आहे तर दुकान फोड्या, घर फोड्या, वाहन चोरी, जनावरे चोरी ची ही चौथी ते पाचवी घटना आहे.

मात्र यात मूर्तिजापूर शहर पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आले असल्याने येथील पोलीस निरीक्षकांच्या कार्यावर प्रश्न उभे राहत असून चोर्ट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे सदर घटने वरून दिसत आहे.घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,मुर्तीजापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक भाऊराव घुगे अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरु असला तरी घटनास्थळावर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे टाळा टाळा केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: