Sunday, December 22, 2024
Homeखेळमूर्तिजापूर | अकोला जिल्हा नेटबॉल पंच परिक्षेचे आयोजन...

मूर्तिजापूर | अकोला जिल्हा नेटबॉल पंच परिक्षेचे आयोजन…

मूर्तिजापूर-महाराष्ट्र ॲमेचुअर नेटबॉल असोसिएशनचे मान्यतेने अकोला जिल्हा ॲमेचुअर नेटबॉल असोसिएशन तथा संकल्प क्रीडा मंडळ द्वारा अकोला जिल्हास्तर नेटबॉल पंच परिक्षा रविवारी दि.२० रोजी स.१०वा.आयोजीत करण्यात आली आहे. ही पंच परीक्षा गाडगे महाराज विद्यालय मेनरोड मूर्तिजापूर येथे होईल.

पंच परिक्षेकरीता अकोला जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक तथा ईच्छुकांनी आधारकार्ड झेरॉक्स,दोन पासपोर्ट फोटो,तिनशे रू.प्रवेशशुल्कासह जिल्हा संघटनेचे सचीव प्रा.जयदीप सोनखासकर मो.क्रं.९८९०५०८०१७ यांचेकडे दि.१९ पर्यंत संपर्क साधावा. केवळ अकोला जिल्ह्यातील रहिवासी सहभाग घेवू शकतात. यापुढे होणाऱ्या जिल्हास्तर शालेय व इतर स्पर्धेसाठी अधिकृत पंच म्हणून ही परिक्षा देणारे पंचच कार्य करतील.

जिल्हास्तर पंच परिक्षेतून गुणानुक्रमे चार पुरूष व एक महिला पंच निवडून नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पंच परिक्षेत सहभागी होता येईल. जिल्हास्तर पंच परिक्षा उत्तीर्ण अधिकृत पंचाना ओळखपञ व प्रमाणपञ देण्यात येईल.तरी जास्तीत जास्त ईच्छुकांनी या संधिचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला जिल्हा ॲमेचुअर नेटबॉल असोसिएशन चे वतीने करण्यात आले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: