Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | कत्तलीसाठी ७० ते ८० बैलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला…

मूर्तिजापूर | कत्तलीसाठी ७० ते ८० बैलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला…

मूर्तिजापूर : शहरातील उड्डाण पुलावर दर्यापूर व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत ७० ते ८० गोवंश घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. सदर ट्रक छत्तीसगड येथील असून गोवंश घेवून तो अवैधरीत्या महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक क्रमांक C.G 04 N.Z 6928 असून छत्तीसगड येथून गोवंश घेऊन अवैद्यरित्या छत्तीसगडची सीमा पार करून महाराष्ट्र मध्ये दाखल झाला असल्याचे माहिती अमरावतीचे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ठाकूर प्रमोद सिंह गडरेल यांना मिळाली होती, यावरून त्यांनी चांदूर बाजार पासून सदर ट्रकचा पाठलाग करत येत असताना दर्यापूर पोलिसांना माहिती दिली असता दर्यापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ताले यांनी यांच्या ताफ्या सह ट्रकचा पाठला केला व जवळ अकोला जिल्ह्याची सीमा येत असल्याने मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन यादव यांना माहिती दिली.

यावरून दर्यापूर पोलीस व मुर्तीजापुर शहर पोलिसांनी भारतीय जनता पार्टी व बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मुर्तीजापुर शहर लगत असलेल्या दर्यापूर रोडवरील उड्डाणपूलवर सदर ट्रक पकडला या ट्रकमध्ये ७० ते ८० हुन अधिक गोवंश छत्तीसगड वरून कत्तली करता कोंबून नेत असल्याचे आढळले. विश्व हिंदू परिषद सह बजरंग दल चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: