Saturday, December 21, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | राज्यमहामार्ग वरील गड्डया ने घेतला दुचाकीस्वाराचा बळी..!

मूर्तिजापूर | राज्यमहामार्ग वरील गड्डया ने घेतला दुचाकीस्वाराचा बळी..!

मूर्तिजापूर ते भातकुली या राज्यमहामार्गावर ठिक-ठिकाणी पडलेल्या गड्डयांमुळे शुक्रवारी दि. २६ रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान शहरातील परमानंद मालानी शाळे नजिक एका दुचाकी स्वारास आपला जीव गमवावा लागलाये ही घटना मूर्तिजापूर ते भातकुली राज्य महामार्गावरील हिरपूर रोड वर परमानंद मालानी शाळे जवळ घडली. मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गाचे नुकतेच काही महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते.

मात्र अल्पकालावधीतच सदर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे पडले आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने वाहन चालवीतांना चालकास रस्त्यावर पडलेले गड्डे वाचवीत मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे याच मार्गावर शहरातील दोन प्रतिष्ठित शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांची वर्दळ कायम असते. शुक्रवारी दि. २६ रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान हिरो होंडा सीडी डीलक्स दुचाकी क्रमांक एम. एच ३० के १५७८ ने मुर्तीजापुर येथील आठवडी बाजार करून शेलुबाजार येथे आपल्या घरी परततांना रस्त्यातील गड्यात गाडी उसळून झालेल्या अपघातात सुधाकर कोंडोजी चव्हाण वय ३५ राहणार शेलुबाजार ता. मुर्तीजापुर यांचा मृत्यू झाला.

तर त्यांच्या सोबत असलेले प्रमोद संभाजी सोळंके वय ३७ रा. मधापुरी हल्ली मुक्काम गायरान मूर्तिजापूर व वेदांत शंकर सोळंके वय १६ रा. मधापुरी हल्ली मुक्काम गायरान मुर्तीजापुर हे दोघे काका पुतले गंभीर जखमी झाले. जखमींना रस्त्यातील इतर वाटेकरुंनीं श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृत्यू झाला.

तर प्रमोद संभाजी सोळंके हे गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना वेदांत शंकर सोळंके यांच्या समवेत पुढील उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले. तर सुधाकर कोंडुजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरनीय तपासणी करिता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे ठेवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: