Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | ३० वर्षीय महिलेची रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या!...

मूर्तिजापूर | ३० वर्षीय महिलेची रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या!…

मूर्तिजापूर : शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून रेल्वे समोर महिलेच्या आत्म्हत्येच सत्र सुरु झाल असून आजही एका 30 वर्षीय महिलेच्या आत्महत्येन शहर हादरून गेलंय. सौ. काजल संकेत कांबे Kajal Sanket Kambe वय वर्ष 30 असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. राजेश कांबे यांच्या सुनबाई असून काजल यांच्या लग्नाला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३० वर्षीय काजल कांबे ह्या स्वतःची स्कूटर घेवून चिखली गेट च्या रेल्वे ट्रॅकवर गेल्या असता पुणे-अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच त्यांनी समोर उडी घेतली रेल्वे चालकाच्या लक्षात येतात गाडीचे ब्रेक लावण्यात आले मात्र धडकेने काजल यांचा जीव वाचू शकला नाही. तिच्या गळ्यात मंगळसुञ, रस्त्याच्या कडेला स्कुटर उभी होती वरुळाजवळ पर्स आढळून आली.

या घटनेची माहिती मिळताच श्री गजानन आपत्कालीन पथक यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरनिय तपासासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांचा मार्गदर्शनाखाली पी.एस.आय वानखडे करीत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: