नरेंद्र खवले, मुर्तीजापुर
मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथे २८ वर्षीय महिलेने पाळण्याचा दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मात्र यावर माहेरच्या मंडळीने थेट सासरच्या मंडळीवर आरोप करीत आमच्या मुलीची पैश्यासाठी हत्या केलाच गंभीर आरोप केलाय याप्रकरणी माना पोलिसांनी नवरा आणि सासरा याला ताब्यात घेतले असून कारवाई सुरु केली आहे.
तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथील २८ वर्षीय सपना आशिष मालधुरे या विवाहितेला एक मुलगा ,एक मुलगी असून त्यांचे पती आशिष हे शेती करतात . १९ डिसेंबर रोजी दुपारी महिलेचा पती आशीष नारायण मालधुरे हा घरुन दुपारी दिड वाजता कँन्व्हेटमध्ये शिकत असलेल्या मुलीला घरी आणण्यासाठी शाळेत गेल्यावर दुपारी २ वाजता दरम्यान सपना हिने घराच्या खोलीत बाळासाठी असलेल्या पाळण्याच्या दोरीचा गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून माहेरच्या मंडळीने सासरच्या मंडळीने सपनाला मारून टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील बसलापूर येथे राहणाऱ्या सपना हीचा विवाह कुरुम येथील राहणाऱ्या आशिष नारायणराव मालदुरे यांच्याशी 2018 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखात गेल्यानंतर सपना आणि आशिष मध्ये भांडण व्हायला लागली त्यानंतर सपना ही बसलापूर येथे आली असता तेथे तिला मारझोड करण्यात आली होती. त्यानंतर चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये 498 गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी परत मुलीला नांदायला पाठवलं. मागील काही दिवसांपूर्वी त्याने माहेरकडील मंडळीला तीन लाखाची मागणी केली होती मात्र आम्ही तळजोड करून त्यांना दीड लाख दिले होते…मात्र पैशे देवूनही आमच्या मुलीला मारल्याचा गंभीर आरोप माहेरकडील मंडळीने केला आहे…