Wednesday, September 18, 2024
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | १३ वर्षीय बालकाचा हृद्यविकारच्या झटक्याने मृत्यू...

मूर्तिजापूर | १३ वर्षीय बालकाचा हृद्यविकारच्या झटक्याने मृत्यू…

मूर्तिजापूर शहरातील फळाचे विक्रेते अब्दुल वाजिद अब्दुल गफूर राहणार मोमीनपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर यांचा मुलगा अब्दुल मुजाहिद अब्दुल वाजिद वय वर्ष 13 याचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुजाहिद च्या अचानक मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

अब्दुल मुजाहिद, अब्दुल वाजिद हा शहरातील काकांनी शाळेमध्ये आठव्या वर्गात शिकत होता. तो दोन बहिणी मध्ये एकटाच भाऊ होता. आज सकाळी तिच्या आईने त्याला झोपेतून उठवले तेव्हा तो उठत नव्हता तेव्हा त्याला डॉक्टरकडे दाखवण्यात आले,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो शाळेमध्ये व मोहल्यामध्ये सगळ्यांचा प्रिय होता. त्याच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: