Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर । महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…

मूर्तिजापूर । महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…

विश्ववंदनीय संत श्री गाडगेबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या संत नगरी मूर्तिजापूर येथे सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला. हा गौरव महाव्हाईस न्यूज तर्फे करण्यात आला. समाजात सफाई कामगार हा घटक कायम उपेक्षित राहिलेला आहे. सामाजिक सोहळ्यात यांना अंतिम टोकालाच ठेवले जाते.

म्हणूनच त्यांचे सेवाकार्यही बेदखलच राहिले आहे. त्यांच्या या सेवा कार्याचा सन्मान व्हावा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे म्हणून महाव्हाईस न्यूज मुर्तीजापुर टीमच्या वतीने नगरपालिकेतील 107 सफाई कामगारांचा सत्काराचा कार्यक्रम भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात सौ.सुप्रियाताई टवलारे, मुख्याधिकारी नगर पालिका याच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता…

या प्रसंगी गजानन गवई, मुख्य संपादक महाव्हाईस न्यूज, संजय आठवले, कार्यकारी संपादक, महाव्हाईस न्यूज, मिलिंद भाऊ बंदिष्टे, कोषाध्यक्ष, भारतीय शिक्षा प्रसारक मंडळ, संतोष भाऊ पाठक,भारतीय शिक्षा प्रसारक मंडळ, व तसेच प्राचार्या नीताताई इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते….तर पाहुणे म्हणून गणेश वाकोडे, द्वारका प्रसाद दुबे, आतिष महाजन, भारत जेठवाणी, राहुल गुल्हाने, सुनील पवार, सुनील तायडे, संतोष गोलाईत, राहुल येदवर, सोबतच चंचल पितांबरवाले, मनीषा गवई,अस्मिता बलखंडे, प्रिया तायडे यांनी उपस्थिती दर्शविली…

तर लखन मिलांदे, रामकवल, गोलू धामणे, रवी सारवाण, सौ. गीता रमेश सौदे, दुर्गेश धामणे सौ.रजनी घनश्याम मिलांदे, सौ आरती रवी सारवण…सह 107 मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला….या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाव्हाईस न्यूज चे शहर प्रतिनिधी अर्जुन बलखंडे आणि नरेंद्र खवले, प्रतिनीधी यांनी केले होते…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: