मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशन सिलेक्शन स्टेट चॅम्पियनशिप फाईल बॉक्सिंग राज्यस्तरीय सिलेक्शन स्पर्धा जगताप मंगल कार्यालय आळंदी पुणे येथे नुकतीच पार पडली यात मूर्तिजापूरच्या कु.कल्याणी हिने गोल्ड मेडल पटकावले आहे.
पुण्यात आयोजीत स्पर्धेत थाई बॉक्सिंग असोसिएशन अमरावती विभागतील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने मूर्तिजापूर हायस्कुल मूर्तिजापूर येथे इयत्ता दहावीत शिकत असलेली विद्यार्थीनी कुं. कल्याणी सुधाकर सदार, हिची सदर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत ७० या गटामध्ये गोल्ड मेडल पटकावत दणदणीत विजय संपादन केला. या विजया बद्दल थाई बॉक्सिंग अमरावती विभागाचे प्रमुख सम्राट डोंगरदिवे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व अकोला जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख गंगाधर जाधव स्पर्धेचे मुख्य रेफरि कार्य केले नॅशनल स्पर्धा आग्रा येथे संपन्न होत असून अमरावती विभागामधून कल्याणी सुधाकर सदार याची निवड करण्यात आली.या यशाचे श्रेय कल्याणी ही आपले आई-वडील तथा शिक्षक आणि कराटे क्लासचे संचालक सेन्सई गंगाधर जाधव यांना देत असून तिच्या विजयाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.