सचिन धुमाळ यांच्या आर बी डिजीटलने घेतला पुढाकार…
मूर्तिजापूर – विदर्भातल्या असंख्य स्वंयसेवी संस्थाना विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशन बॅनरखाली एकत्रीत करून स्वयंसेवी संस्थांना प्रोजेक्टसह सिएसआर फंड व वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान मिळवण्यासाठी येणाऱ्या अनेक अडचणींना वाचा फोडण्याच्या हेतूने आर बी डिजिटलचे संचालक सचिन धुमाळ यांच्या संकल्पनेतून गत सहा-सात महिने अगोदर विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशन या नावाने बिजारोपण करून संस्थांना होणारा त्रास संस्थेसाठी लागणारी कागदपत्र संस्थांची यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक यासह येणाऱ्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहून विदर्भातल्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक स्वरूपाच्या प्रवाहात आणून त्यांना आर्थिक बळकट कसे करता येईल व स्वंयसेवी संस्थाच्या माध्यमातून समाजाचा विकास कसा साधता येईल यावर धुमाळ सरांची अधिक भर असणार आहे.
आर बी डिजिटलच्या माध्यमातून देशातल्या २२ राज्यात एनजीओना कागदोत्री सक्षम करून त्यांना योग्य प्रकारचा सल्ला देत उंच भरारी घेऊन आर्थिक पिळवणुकीला आळा घातल्याबद्दल आर बी डिजिटलच्या संचालक सचिन धुमाळ यांना लंडन येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
याबद्दलचे सर्व श्रेय हे त्यांच्यासोबत जुळलेल्या स्वयंसेवी संस्था चालकांना देत आहे आणि स्वयंसेवी संस्था चालकाकडून मिळालेला अतिउत्तम प्रतिसाद त्या प्रतिसादाच्या कामाची एक पावती म्हणून हा सन्मान मला मिळत असल्याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
नागपुरातल्या हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत असंख्य संस्था चालकांची उपस्थिती होती त्यामध्ये योग्य आणि सत्याचा मार्ग दाखवून संस्थाचालकांना काम करण्याची ऊर्जा देऊन मंत्र सुन्न केलं याच सोबत जीवनात यश संपादन करण्यासाठी अनेक अडचणीवर मात करून यशाच्या शिखरावर कसं पोहोचता येईल याचं जिवंत उदाहरण असणारे हेमंत सोनारे हे या बैठकीला उपस्थित होते.
त्यांनी अमूल्य असं मार्गदर्शन संस्था चालकांना केले आणि ” मी उद्योजक होणार ” ही संकल्पना घेऊन पूर्ण भारतभर भ्रमण करणार असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून बोलून दाखविले. त्याच बरोबर उपस्थित संस्थाचालकांना त्यांनी केलेला अनेक समस्यांचा सामना किंवा त्यांच्या पुढे असलेला समस्याचा डोंगर हा कशाप्रकारे कमी करता येईल.
यावर योग्य तो रस्ता दाखविण्याचं काम धुमाळ सरांनी केलं झालेल्या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित संस्था चालकांना एक नवी दिशा भेटली असून एक आशेचा किरण धुमाळ सरांच्या माध्यमातून उभा झाला आहे आणि आरबी डिजिटल हे स्वयंसेवी संस्थांना एक देव दुताच्या रूपात मिळाले असल्याचा सूर उपस्थितांमधून निघाला सदर बैठकीला आरबी डिजिटलचे संचालक सचिन धुमाळ ,हेमंत सोनारे ,विदर्भाच्या कन्या वनिता डेकाटे, निकिता नंदनवार ,
डेकाटे, कल्याणजी कुसूमदे, मिलींद जामनिक ,गुणवंत वासनीक ,विवेक नगरे ,उषा वानरे ,कर्मा तेलंग ,वैशाली इंगळे, वैभव लकडे, सिद्धार्थ समदुरे ,राहुल वानखडे ,बाबाजी गणोरकर , अमोल पोटदुखे ,आनंद सोनवणे, कबीर निकोरे, वैशाली परेकर ,अभय पवार , निलेश बन्सोडे, वैशाली चव्हाण, दिलीप तांदळे यांच्यासह अनेक संस्थाचालकाची उपस्थीती होती.