Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | चिखली,खरब ढोरे या गावाला पावसाचा मोठा फटका...रात्रीपासून पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला...

मूर्तिजापूर | चिखली,खरब ढोरे या गावाला पावसाचा मोठा फटका…रात्रीपासून पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला दिपक सदाफळे यांच्या टीमने वाचविले…

मूर्तिजापूर तालुक्यातील आलेल्या जोरदार पावसाने नदी, नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची पेरणी केलेली शेती पाण्याने खरडून गेली. तर खरप ढोरे आणी चिखली गावातील नागरिकांच्या घराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. हे दोन्ही गावे रात्री तीन वाजता पासुन पुराने वेढल्या गेले होते यात अडकलेल्या नागरिकांना व गुरे ढोरांना काढण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन करीता पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या मदतीला धावून आलेत आणि पुरात अडकलेल्या एका शेतकऱ्याला वाचविण्यात मोठे यश आले.

दिपक सदाफळे (जिवरक्षक) यांचेसह शोध व बचाव साहीत्यासह रेस्क्यु बोट घेऊन चिखली येथे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती सोबतच खरप ढोरे तीच परिस्थिती बघायला मिळाली येथे अर्ध्या गावाला पुराने वेढले होते अनेकांच्या घरात पाणीच पाणी अनेकांचे घरे पाण्यामुळे पडली होती, तसेच धान्यही पाण्यात गेलेले होते अशा परिस्थितीत सगळे गावकरी भयभीत झाले असताना उपविभागीय अधिकारी अपार सर आणी तहसील बोबडे मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला.

अश्यातच एक की.मी.अंतरावरील शेतात रात्रीपासून शेतकरी अडकलेला असल्याचे माहिती पडताच अपार सर आणी बोबडे मॅडम यांच्या आदेशाने रेस्क्यु ऑपरेशन चालु केले पुरात रेस्क्यु बोट टाकली यावेळी पाण्याचा प्रवाह एवढा होता की , पुरामध्ये जाणेही शक्य नव्हते, पाण्यात विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत होत्या पुढे पुल अशा अडचणी चा सामना करुन बाजीराव उईके वय अंदाजे (45) वर्ष या शेतक-यास सुखरुप रेस्कू केले.

यानंतर गावक-यांना धीर देत या रेस्क्यु टीमने मानवतेचा धर्म दाखवुन मदत कार्य सुरु केले. यावेळी पुर्ण वेळ मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अपार सर आणी तहसीलदार बोबडे मॅडमसह नायब तहसीलदार बनसोड साहेबांसह मंडळ अधिकारी तलाठी व मुर्तीजापुर पोलीस अधीकारी पोलीस कर्मचारी हजर होते. अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी दीली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: