Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | ४० वर्षीय शेतीकाम करणाऱ्या इसमाची आत्महत्या...

मूर्तिजापूर | ४० वर्षीय शेतीकाम करणाऱ्या इसमाची आत्महत्या…

प्रतिनिधी/मूर्तिजापूर

तालुक्यातील ग्राम शेरवाडी येथील विनोद मोतीराम खंदाटे या इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी ७:३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार श्रावण दौलत सिळामे वय ६० यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावात फिर्यादीची बहीण व मृतक विनोद खंदाटे वय ४० जावई हे मागील पंधरा वर्षापासून कुटुंबासह राहत होते.

शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.काहीही काम धंदा करीत होता.तसेच दि.१८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान करून तो दिवसभर गावात दारू पिऊन फिरल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास राहत्या खोलीत झोपला असता,सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.

सदर घटनेचा ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून घटनेचे नेमके कारण कळले नसल्याने फिर्यादीने दिलेला जबानी रिपोर्ट यावरूण सदर प्रकरणी मर्ग दाखल करून पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: