Sunday, December 22, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर | माजी सभापती भावना सदार यांच्यासह राजू सदार भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा...

मूर्तिजापूर | माजी सभापती भावना सदार यांच्यासह राजू सदार भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार…ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलचा पराजय जिव्हारी लागला…

मूर्तिजापूर- शेलुवेताळ-शेरवाडी या गटग्रामपंचायत मध्ये निवडणुकीत भाजपचे सदस्य राजू सदार यांच्या पॅनलचा पराभव झाल्याने त्यांच्यासह त्याच्या पत्नी माजी सभापती भावना सदार हे भाजपचा सदस्य पदाचा राजीनामा देण्यार असल्याचे महाव्हाईस न्यूज ला सांगितले.

या निवडणुकीत स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या पॅनल सोबत राजकीय गेम केला असून भाजपाचे पॅनल असलेल्या राजू सदार यांच्या पॅनल सोबत राजकीय खेळी रचून पराभव केल्याचे राजू सदार यांचे म्हणणे आहे. भाजप आमदाराच्या या कुटनितीला माझं पॅनल बळी पडले म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत, सोबतच वेताळबाबा संस्थेचा अध्यक्षपदाची राजीनामा देत आहो व सोबत उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष सुद्धा राजीनामा देणार असल्याचे महाव्हाईस न्यूज शी बोलतांना सांगितले आहे.

तर भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या पॅनलचा स्वतःच्या गावात सोनाळा-पल्सोडा या गट ग्रामपंचायतमध्ये पॅनलचा धुव्वा उडाल्याने हाही एक चर्चेचा विषय बनला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: