नरेंद्र खवले
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना वरील नामफलक मराठी देवनगरी लिपित ठळक अक्षरांत लिहणे बंधनकारक केले आहे.त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर पर्यत मुदत ही दिली होती. परंतु मुदत संपूनही मूर्तिजापूर शहरातील काही दुकानावर इंग्रजी भाषेत नामफलक लागले आहेत.
हे लोक हेतू परस्पर मराठी भाषेचा अपमान करत आहेत. याकडे मूर्तिजापूर मुख्यधिकरी न.प याचे ही दुर्लक्ष आहे.या सर्व दुकानावरील नामफलक आठ दिवसाच्या आत मराठी भाषेत करण्यात यावे.जे दुकानदार मराठी नामफलक लावणार नाहीत.
तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याक आंदोलन छेडाण्याचा इशारा मनसे मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी मुख्याधिकारी न.प.यांना निवेदनद्वारे दिला आहे.निवेदन देतेवेळी ता.संघटक चेतन सोळंके,जि. प.सर्कल अध्यक्ष रोहन नवघरे,शहर उपाध्यक्ष अनिकेत शिरभाते, वैभव महल्ले,सचिन काटोले,आशिष कावरे, ओम दवंडे,उपस्थित होते.