Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकमूर्तिजापूर | मोहन खवले यांच्या मातोश्री सुशीलाबाई श्रीधरराव खवले यांचे मरणोपरांत देहदान...

मूर्तिजापूर | मोहन खवले यांच्या मातोश्री सुशीलाबाई श्रीधरराव खवले यांचे मरणोपरांत देहदान…

मूर्तिजापूर येथील प्रतिष्ठित उद्योजक मोहन श्रीधरराव खवले खवले एजन्सी चे संचालक यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलाबाई श्रीधरराव खवले यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी आज दि.22/4/2024 सोमवार रोजी सकाळी 12.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने खवले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आठवणी ताज्या राहाव्या यासाठी यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचा देह अमरावती येथील पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेज पचवंटी येथे मेडिकलच्या विद्यार्थांना शिकता यावे यासाठी दान केला आहे.

समाजकार्याची आवड असणार्या सुशीलाबाई वडील श्रीधरराव हे अत्यंत कष्टाळू होते. त्यांची समाजाप्रती बांधलकी असल्याने त्यांनी समाज कार्य म्हणून स्वतः पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेज पचवंटी अमरावती येथे देहदान केले. जेणे करून मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल यासाठी हा निर्णय घेतला.

सुशीलाबाई यांना गर्भपिशवीचा कॅन्सर होता व तेथील विद्यार्थी त्यांच्या शरीरावर रिसर्च करून भविष्यात औषधी शोधतील असा परिवाराचा मानस आहे. पुढील येणाऱ्या मोठ्या आजाराला त्यांच्यामार्फत समाजाला दिशा मिळेल व आजाराला पुर्णपणे औषधोपचार मिळेल. त्यांच्यापश्चात मुलगा व सुन दोन नाती आहेत. मुलगा आणि सुनेने सुद्धा देहदान करण्याचे ठरविले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: