Sunday, January 5, 2025
HomeSocial Trendingमूर्तिजापूर | भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून भाऊ ठेकेदारासोबत दिल्लीला…

मूर्तिजापूर | भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून भाऊ ठेकेदारासोबत दिल्लीला…

मूर्तिजापूर : कालपासून दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे, संपूर्ण देश्याच्या कोण्याकोपर्यातून भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली तर अकोला जिल्ह्यातूनही भाजपचे लोकप्रतिनिधी दिसले. मात्र चर्चा होत आहे मूर्तिजापूर येथील आमदारांची, भाऊने दिल्लीला चक्क एका खासगी ठेकेदाराला घेऊन गेल्याने भाजपच्या गोटात मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

खरंतर भाऊसाठी जीवाचे रान करणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. एका खासगी ठेकेदाराला सोबत घेऊन जाऊन व कार्यकर्त्याना जाळण्यासाठी फोटो टाकत असल्याचे असे जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दिल्लीची वारी जवळच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. एकतर जिवाभावाचे कार्यकर्ते मिळणे कठीण आहेत, जे जुने होते त्यातील काहींनी मस्त हात धुवून घेत भाऊच्या बरोबरीने संपत्ती उभी केली आहे. आता तर यातील काही कार्यकर्ते जर दूर गेले तर नवीन कार्यकर्ते मिळणे कठीण होईल आणि कार्यकर्त्याशिवाय निवडणूक शक्य नाही.

दुसरीकडे भाऊंचे कार्यकर्ते शहरात फिरतांना दिसले की काही जण त्यांना डिवचन्यासाठी म्हणतात “भाऊ सोबत तुम्ही गेले नाही दिल्लीला” असे शब्द ऐकून काही कार्यकर्ते थेट बायपासचा रस्ता पकडतात भाऊचा राग मग 180* वर काढतात, रात्रीचा कार्यक्रम उरकून घेऊन, भाऊने मला न नेल्याचे दुःख व्यक्त करीत आहे. आता हे जवळचे कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्ही समजून घ्या…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: