Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | वकिलाला मारहाण प्रकरण...नेमक काय घडलं?...पहा Video

मूर्तिजापूर | वकिलाला मारहाण प्रकरण…नेमक काय घडलं?…पहा Video

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर दि. २४ एप्रिल रोजी अकोला येथील अग्रवाल वकिलांना काही जमावाने शिवीगाळ करत मारहाण केली होती. या घटनेचे Video सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याच बरोबर या घटनेचा सुरुवातीचा एक Video तोही सोशल मिडीयावर व्हायरल होतोय, जेथून वादाला सुरुवात झाली होती. त्या Video मध्ये पवनेश अग्रवाल हे हातातील पाईप चालकाच्या अंगावर उगारतांना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही अमरावतीवरून अकोला कडे येथे येत असतांना कुरुम जवळील एका ठिकाणी ओव्हरटेक वरून एवढा मोठा वाद निर्माण झाला. एड.पवनेश अग्रवाल हे स्कार्पिओने जात असतांना समोरील वाहन क्रेटाच्या चालकाला पुढे जाण्यासाठी साईड मागत होते. त्यासाठी ते सातत्याने हॉर्न वाजवीत होते, मात्र क्रेटा चालकाला कार साईडला घेणे रिस्क वाटत असल्याने ते घेत नव्हते, नंतर २ मिनिटांनी त्यांना पास केले. अग्रवाल यांनी गाडी पुढे नेताच अचानक थांबविली आणि क्रेटा चालकालाही थांबण्यास सांगितले. त्यांनतर अग्रवाल गाडीतून उतरून थेट क्रेटा चालकाच्या अंगावर गेले एवढच नाहीतर त्यांनी गाडीत बसलेल्या पत्नीकडून लोखंडी पाईप सुद्धा मागविला. असे क्रेटा चालक सतिश दत्तुजी ढाकरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सतीश ढाकरे यांच्या सोबत स्कार्पिओवाल्यासोबत वाद झाल्याचे कारंजा बायपास येथील त्यांच्या मित्रांना समजतात चालक मित्र मंडळी तसेच इतर तरुणही जमा झाले आणि अग्रवाल यांची गाडी येताच निर्मान्धीन पुलाजवळ थांबविण्यात आली आणि तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. सदर घटना मागे बसलेल्या एड.अग्रवाल यांच्या पत्नीने मोबाईल मध्ये शूट केलाय.

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ मध्ये एड.पवनेश अग्रवाल हे क्रेटा चालक सतिश ढाकरे यांना चांगलच सुनावत असल्याचे दिसत आहे. त्याच बरोबर हात लोखंडी पाईप असून तो क्रेटा चालकावर उगारतांना दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, कारंजा बायपास येथे जमलेल्या तरुणांनी एड.अग्रवाल यांना मारहाण व शिवीगाळ करीत असल्याचे दिसत आहे. दोन्ही व्हिडिओ हे एड.अग्रवाल यांच्या पत्नीने मोबाईलवर शूट केलेत आणि त्यातील एक फक्त मारहाणीचा Video व्हायरल केला…

प्रवास करताना अनेक अश्या घटना घडतात, मात्र शुल्लक कारणावरून एवढा मोठा वाद होणे, तोही समाजातील प्रतिष्ठीत मानली जाणारी व्यक्तीकडून…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: