Thursday, January 9, 2025
Homeकृषीमूर्तिजापूर | पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या...शिवसेनेच्या...

मूर्तिजापूर | पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या…शिवसेनेच्या वतीने मागणी…

मूर्तिजापूर : काल दि.१८/०७/२०२३ रोजी मूर्तिजापूर तालुक्यात अति मुसळधार पाऊस पडला तर कुठे कुठे ढग फुटी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली शेती रखडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बर्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मूर्तिजापूर तालुका प्रमुख मा. अप्पूदादा तिडके शहर प्रमुख मा. विनायक भाऊ गुल्हाने,उपसभापती देवाशिष दादा भटकर, चंचलभाऊ येवले, सुरेंद्र भाऊ वरोकर, अंगद भाऊ ठाकरे अक्षय लकडे,ऋषभ ठाकरे, दिलीप खोकले, संजय भाऊ गुलवाडे, शेखर कावरे, योगेश काटे, नंदुभाऊ पोळकट, हेमंत कांबे धीरज उमाळे, अभी लाडे, यश थाटे, सर्व शिवसैनिक युवसैनिक शेतकरी उपस्थित होते

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: