Sunday, December 22, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या!...

मूर्तिजापूर | शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या!…

मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपुर गावातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी उघडीस आली. मयत तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते, अंगावर लग्नाचे कर्ज असल्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस सदर घटनेचा तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या गाजीपूर गावातील अवधूत दिलीप तायडे वय अंदाजे २६ वर्ष हा शुक्रवार दिनांक २५/०८/२०२३ ला दुपारी १२ वा सुमारास घरुन निघून गेला असता संध्याकाळी ६ वाजता त्या ची टु व्हिलर गाडी नदीच्या काठावर उभी दिसली. गावातील २० ते २५ मुलांनी आजुबाजूचा सपूर्ण परिसर रात्री १२.वाजे पर्यंत पिंजून काढला मात्र तो दिसला नाही. अखेर २६/०८/२०२३ ला सकाळी ६ वाजता काही मुलांना गावाबाहेर निबांच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अवधूत याचे लग्न नुकतेच मे महिन्यात झाले होते त्यांच्या आई वडीलांना आत्महत्येचे कारण विचारले असता त्यांनी लग्नाचे कर्ज असल्याचे सांगितले. त्यांचे वडीला कडे फक्त 67आर शेती आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: