मूर्तिजापूर शहरातील प्रतिष्ठित डॉ. खुशबू गुल्हाने याच्या अकस्मात मृत्यू खबरेने शहरात खळबळ उडाली आहे. तर डॉक्टर गुल्हाने यांचा अपघाती मृत्यू झाला की आणखी दुसरं काय? शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. डॉक्टर खुशबू यांच्या अचानक जाण्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांचे पार्थिव सध्या नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात विच्छेदनासाठी कालपासून ठेवले आहे. तर आज सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांच्यावर मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.
शहरातील डॉ.गोविंदराव गुल्हाने व डॉ.सौ. ज्योतीताई गुल्हाने यांची सून डॉ.स्वप्नील गुल्हाने यांची पत्नी एवढीच ओळख नसून त्या शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीमुळे त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्याचं माहेर हे गडचिरोली जिल्ह्यातील असून माहेरकडील आडनाव सोमनकर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. खुशबू यांचा आठ दिवसांपूर्वी कंझरा रोडवर त्यांच्याच फार्महाऊस जवळ गाडीवरून पडल्याने त्यांना शहरातील एका डॉक्टर कडे नेण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या मोठ्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे पाच सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र काल सकाळी अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या अचानक जाण्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर शहरातील काही ठिकाणी त्यांची काही दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केल्याचे बोलले जाते तर काही जण अपघात झाल्याचे सांगतात. डॉ. खुशबू यांचा विच्छेदनाच्या रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलणार?…