Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | बोलोरोची दुचाकीला मागून धडक…धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…हिरपूर ते ब्रह्मी रोडवरील...

मूर्तिजापूर | बोलोरोची दुचाकीला मागून धडक…धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…हिरपूर ते ब्रह्मी रोडवरील घटना…

मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर ते ब्रह्मी रोडवर अपघातात एका 60 वर्षीय इसमाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली असून महिंद्रा बोलेरो या गाडीने ब्रह्मी येथे जात असलेल्या दुचाकी स्वाराला मागून धडक दिल्याने मृत्यू झाला. मिर जाकिर हूसेन तसद्दूक हूसेन ६० वर्ष वय ,रा.जुनी वस्ती, मुर्तिजापूर. असे मृतकाचे नाव आहे.

मूर्तिजापूर ते ब्रम्ही रोडवर बोलेरो MH 27 X 7164 क्रमांकाच्या गाडीने हिरपूर रोडवरील सत्संग भवन जवळ हिरपुर-ब्रम्ही रस्त्याने दुचाकीवर जात असताना महिंद्रा बोलेरो या गाडीने मृतकाच्या दुचाकी वाहनास पाठीमागून धडक दिली व मृतकाची गाडी वाहनात अटकल्याने जवळपास 300 ते 400 मी. घासत गेली त्यात त्यांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: