मुर्तिजापूर विधानसभेमध्ये भाजप पक्ष वगळता काही पक्षांमध्ये भावी आमदारांची मोठी गर्दी झाली आहे. तर सोशल मीडियावर सध्या एका भाजपच्या प्रसिद्ध पिसाट भावी उमेदवाराची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे, हा उमेदवार गेल्या एक दीड वर्षापासून मतदारसंघात गावोगावी फिरून आपण भावी आमदार असल्याचे सांगत असून मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचा असल्याचा मतदारसंघात सांगत फिरत आहे. मात्र तसं काही नसून हा उमेदवार प्रसिद्ध पिसाट असून कोणत्याही मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जवळ जाऊन सेल्फी काढून स्वतःचे फोटो व्हिडिओ टाकून आणि त्यासोबत चर्चा करताना मजकूर लिहून लोकांना मूर्ख बनवत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेते या व्यक्तीला ओळखत नसून भाजपा कार्यकर्ता म्हणून जवळ येवू देतात त्याचा चांगलाच फायदा या भावी उमेदवाराने घेतला आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते याची दुरूनच गंमत पाहत आहेत.
या भावी उमेदवाराला कोणीतरी सल्ला दिली की या मतदारसंघात भाजप फक्त हाफ एस.सी. ना तिकीट देते म्हणून ही भावी उमेदवार चक्क आपण मोची समाजातील असल्याचं लोकांना सांगत फिरत आहे. याला मतदारसंघातील काही भोळी बाभळी जनता बळी पडली असून काही शिक्षित लोकांना या उमेदवाराची असली जात माहीत झाल्यामुळे या उमेदवारापासून लांब राहतात. या उमेदवाराचं मतदारसंघात असलं कोणतेही कार्य नाही की ज्या कार्यामुळे या उमेदवाराचं कोणी नाव घेईल?. या उमेद्वारच्या स्वतःच्या गावात 10 मतही मिळणार नाहीत. विशेष म्हणजे हा उमेदवार कमी शिकलेला असल्याने भाजप या उमेदवाराला भाजपची उमेदवारी देईल का? मग भाऊ च्या उमेदवारीचे काय होईल?…
या मतदार संघात भाजपच्या आमदाराने 15 वर्षात किती काम केल आहे हे येथील मतदारांना चांगलच माहित आहे. त्यातच विदर्भात भाजपच्या लोकप्रियतेचा ग्राफ कमी झाला हे आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात पहिले. म्हणूच यावेळी भाजप चांगल्या आणि निष्ठावंत उमेद्वारच्या शोधात आहे. भाजपचा आणखी शेवटचा एक सर्व्हे होणार आहे, ज्यामध्ये जो उमेदवार मेरीट मध्ये येईल त्यालाच तिकीट देणार आहे. असे सोशल मिडीयावर फालतू पोस्ट टाकून प्रसिद्धी पिसाट उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही.
मागील निवडणुकीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या पक्षात भावी उमेदवारांनी तिकिटासाठी मोठी रांग लावली आहे. तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी कॉंग्रस शरद पवार यांच्या गटाला सुटणार असल्याने सर्वात जास्त गर्दी या पक्षात झाली असून अजूनही भावी उमेदवार पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत.