मूर्तीजापुर – विलास सावळे
मूर्तीजापुर शहरात भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान पर्व 2024 चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक बुथ क्रमांक 113 वर आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या सदस्यता अभियानाचा प्रभाव मुर्तीजापुरमध्येही दिसून येत आहे.
कार्यक्रमात शहराध्यक्ष रितेश सबजाकर यांनी सांगितले की, “भारतीय जनता पार्टीने देशभरात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सदस्यता अभियान राबवले आहे. आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीजापुरमध्ये हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे.”
या वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रितेश सबजाकर, राजेश कांबे, राम जोशी, दिगंबर सरदार, बबलू भेलोंडे, अभिजित डहाळे,गजानन नाकट, अतुल लाटा, मोहन डोंगरे, दिग्विजय गाडेकर, धनंजय कुलकर्णी, विष्णु लोडम, गिरी महाराज, ढोरे, आणि भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात पक्षाच्या सदस्यत्वासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. या सदस्यता नोंदणी अभियानामुळे भारतीय जनता पार्टीची शहरातील पकड अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सदस्य नोंदणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती, आणि या उपक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला