मूर्तीजापूर – पावसाळा आला की कुठे कमी पाऊस तर कुठे अतिवृष्टी अशातच गावकरी व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. कोणत्या ना गावाचा तर अतिवृष्टी मुळे संपर्कच तुटून जाते. काही का होईना यावेळी दिलासा देण्यासाठी शासन धावून येते.
याचप्रमाणे कुरणखेड सर्कल मधील मौजे कोळंबी, दाळंबी, मुस्तफापुर दुधलंम मिर्झापुर येथे दि 18/7/2023 च्या मद्यरात्री झालेले अतिवृष्टीमुळे नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली सोयाबीन तूर कपाशी व भाजीपाला पिकाची मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावेळी मा शशिकीरण जांभाळूनकर तालुका कृषी अधीकारी अकोला यांनी कृषी सहायक टीम अकोला तालुका यांना युद्धपातळीवर सर्व्हे करण्याचे आदेश दिले तसेच शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच रोहिणी मोहाड कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला व अजय देशमुख ,कृ प, गणेश पराडकर कृ स राठोड,
घटोळ, वानखेडे ,हिवाळे,भड,कृ स बाळाभाऊ बढे प्रतिष्ठित नागरिक योगेश खांदेल,ऋषिकेश देवके दिलीप तलोकार शेतकरी पुंडकरभाऊ उपसरपंच कोळंबी के व्ही बोधडे कृषी सहायक कोळंबी आणि गझलकार मिलिंद इंगळे व बहुसंख्येने शेतकरी बंधू उपस्थित होते.