मूर्तिजापूर – दि. १४/०८/२०१५ रोजी संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या दरम्यान मुंगशी येथील पोलीस पाटील त्यांच्या घरी असताना मुंगशी गावातीलच साहेबराव गवई त्यांचे दोन मुलं रोशन साहेबराव गवई व आनंद साहेबराव गवई व पत्नी यांनी जबरदस्तीने पोलीस पाटील यांच्या घरामध्ये घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ करून पोलिस पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना देखील मारहाण केली त्यामुळे मार लागल्याने पोलीस पाटील यांना दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागले करिता पोलीस पाटील यांनी वरील आरोपीं विरुद्ध मूर्तिजापूर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता त्यावरून वरील आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान चे कलम ४५२, ३२३, २९४, ५०६, सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर वरील खटला हा मूर्तिजापूर येथील न्यायालयात चालविण्यात आला. सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने आरोपींविरुद्ध गुन्हा साबित करण्याच्या दृष्टिकोनातून आठ साक्षीदार तपासण्यात आले आरोपीच्या वतीने ॲड. सचिन वानखडे यांनी साक्षीदारांची उलट तपासणी पूर्ण केली. युक्तिवादा मध्ये सरकार तर्फे न्यायालयात सांगण्यात आले की साक्षीदारांचे बयान एकमेकांना पूरक असून वरील आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे पूर्णपणे सिद्ध होत आहे करिता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.
त्यानंतर आरोपीच्या वतीने आरोपीचे वकिलांनी न्यायालयात सांगितले की आरोपींनी पोलीस पाटील यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने सर्व आरोपींना सदर केस मध्ये खोट्या रीतीने अडकविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी घेतलेल्या साक्षीदारांच्या बयानात व न्यायालयामध्ये दिलेल्या साक्षीदारांच्या पुराव्यात सुद्धा तफावत आढळून येत असल्याचे आरोपीचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे प्रस्तुत केस भारतीय दंड विधान चे कलम ४५२, ३२३, २९४, ५०६, सह कलम ३४ अन्वये पूर्णपणे सिद्ध होत नसल्याचे देखील न्यायालयात युक्तिवादा दरम्यान कथन केले. आरोपींच्या बचावा करिता आरोपीचे वकिलांनी उच्च न्यायालयाच्या काही न्याय निर्णयाकडे सुद्धा न्यायालयाचे लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे आरोपीच्या वकिलांनी इतरही सदर प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधून न्यायालयास सांगितले की केवळ जुन्या दुश्मनीतून फिर्यादीने ही केस खोट्या रीतीने तयार करून आरोपींचा वचपा काढण्याकरिता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले करिता संशयापलीकडे जाऊन सदरची केस आरोपींविरुद्ध सिद्ध होत नसल्याने आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात यावे असे युक्तिवाद दरम्यान न्यायालयात सांगितले.
सरकारी पक्ष व आरोपींच्या वतीने युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदर प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली आरोपींच्या वतीने सदर केसचा खटला ॲड. सचिन वानखडे यांनी चालविला.