Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापुर | अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मोहन सदार...

मूर्तिजापुर | अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मोहन सदार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

मूर्तिजापुर प्रतिनिधी : तालुक्यातील शेलू वेताळ येथील मोहन सदार यांच्यावर गावातील ४३ वर्षीय इसमाला रस्त्यात अडवून त्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप आज रोजी पोलीस स्टेशनला सादर केल्याने अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वामन लक्ष्मण वानखडे वय 43 वर्ष व्यवसाय शेती रा. शेलू वेताळ असे फिर्यादीचे नाव असून त्याने 24 मेला आरोपी विषयी तक्रार दाखल केली होती.

हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील आरोपीने फिर्यादी हा त्याचे घरी जात असताना त्यास रस्त्याचे मधोमध मोटरसायकल आडवी लावून अडवून त्यास तू माझा सतत तक्रारी का करतो असे म्हणून दमदाटी करून तुया मर्डर करतो अशी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली…तर फिर्यादीचे जबाब व सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग वरून 173/2023 कलम 341,294,506,भादंवि सह कलम 3(2)(va) अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सदरचा गुन्हा दाखल करून मूर्तिजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन दाखल अधिकारी-पोउपनि सत्यजीत मानकर व प्राथमिक तपास -सपोनि गोविंद पांडव हे तपास करीत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: