Tuesday, September 17, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | ३४ वर्षीय युवकाने रेल्वे समोर उडी घेत जीवन संपविल...युवक कारंजा...

मूर्तिजापूर | ३४ वर्षीय युवकाने रेल्वे समोर उडी घेत जीवन संपविल…युवक कारंजा येथील

मूर्तिजापूर | आठवडी बाजार येथील रेल्वे पुलाखाली एका ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संदीप नारायणराव इंगळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो कारंजा येथील रहिवाशी असल्याचं त्याच्या आधार कार्ड वरून समजते. आज सकाळी चार वाजताच्या दरम्यानची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर युवकाच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या नातेवाईकाला शहर पोलिसांनी दिली आहे.

मूर्तिजापूर आठवडी बाजार येथील उड्डाण पुलाखाली रेल्वे रुळावर कटलेले अवस्थेत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असून या घटनेची माहिती आपत्कालीन पथकाला माहिती होताच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कागदपत्राचा शोध घेतला असता. त्या मृत व्यक्तीचे आधार कार्ड सापडून आले. त्या आधार कार्ड द्वारे सदर व्यक्ती हि कारंजा लाड असल्याचे समोर आले तर सदर घटना आज सकाळी साडेतीन ते चार वाजता च्या दरम्यान घडल्याची माहिती मिळाली आहे.

संदीप नारायणराव इंगळे, महादेव मंदिर जवळ असलेल्या माळीपुरा येथील रहिवासी असल्याचे सापडलेल्या आधार कार्ड वरून समजते. आत्महत्या केल्याचं कोणतेही कारण सध्या स्पष्ट नसलं तरी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे व आपत्कालीन पथकाच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: