Saturday, December 28, 2024
Homeराजकीयमुर्तिजापूर | लाखपुरी येथे पदवीधर निवडणूकी मध्ये ५६.४३ टक्के मतदान...

मुर्तिजापूर | लाखपुरी येथे पदवीधर निवडणूकी मध्ये ५६.४३ टक्के मतदान…

• मतदान टक्केवारित घसरण… • काही मतदार बाहेरगावी…

लाखपुरी :३० मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ ची निवडणूक ३० जानेवारी रोजी, सकाळी ७.३० वा. पासुन ४ वाजेपर्यंत शांततेत पार पडली यावेळी लाखपुरी येथील केंद्रावर पदवीधर मतदार केंद्र क्र – १२३ मध्ये, एकूण मतदार -५२८ होते.त्यापैकी झालेले मतदान -२९८ , पुरुष -२११ , महीला -८७ असे मतदान झाले.

मतदान टक्केवारी -५६.४३ एवढी झाली असुन निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव , उपनिरीक्षक रनजित खेडकर , नारायण आवडकर , गजानन सयाम , यादव मेजर , ढोरे मेजर , महीला कर्मचारी होते.निवडणूक अधिकारी अशोक बांगर , विजय किर्तेने , सुहास पाटील , वाकोडे बाबु , सोहेल चाऊस , ग्रामसेवक गोवर्धन जाधव , मंडळ अधिकारी रामराव जाधव , तलाठी संदिप बोळे , इत्यादी यंत्रणा उपस्थित होती . ग्रामपंचायत लाखपुरी येथील सरपंच अजय तायडे , उपसरपंच राजप्रसाद कैथवास , सर्व ग्रा.प.सदस्य गण ,शिक्षक राहुल तिडके , ग्रा.प कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: