मूर्तिजापूर : लोकसेवक पुरवठा अधिकारी चैताली यादव सामान्य जनतेला अपमानस्पद वागणूक देण्यासाठी संपूर्ण तालुक्यात कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या मुजोरी आणि अरेरावीला नागरीक कंटाळले आहेत, या बयेने ज्या- ज्या ठिकाणी काम केलं तिथं हेच काम असल्याची माहिती आहे. मूर्तिजापूर तालुकात रेशन माफीया कडून ही महिला अधिकारी तगडी वसूली करीत असल्याची खात्री लायक माहिती हाती आली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक गोरगरीब जनतेकडून रेशन कार्ड बनविण्यासाठी पैसे घेतल्याच्या अनेक तोंडी तक्रारी आहेत, या माध्यमातून हजारो रुपये त्या रोज घरी नेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या संदर्भात त्यांच्या अनेक तक्रारी असताना त्यांना वरीष्ठ पाठिशी घालतात हे स्पष्ट होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पापळकर यांनी चैताली यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई पण केली होती. अवैध वसूली अंगलट येऊ नये म्हणून तीने बचावासाठी असे एक रजिस्टर केले आहे, ज्यामध्ये आम्ही रेशन कार्ड साठी पैसे दिले नसल्याचा उल्लेख आहे. त्यावर नागरिकांच्या सह्याही घेतल्या जातात. मात्र पैसे दिल्याशिवाय रेशनकार्ड मिळत नाही हेही तेवढं खरं आहे, त्यासाठी चार, पाच एजेंट नेमलेले आहेत, त्यापैकी काही स्वस्त धान्य दुकानदार आहेत जे ग्राहकांना व्यवस्थित पटवून सांगतात आणि दोन हजार द्यायला सांगतात.
आता गेल्या दोन दिवसांपासून या उद्धटपणे बोलणाऱ्या बाई विरुद्ध तालुक्यातील विरवाडा गावातील ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणस्थळी भेट देण्यासाठी मूर्तिजापूर तहसीलदार शिल्पा बोबडे गेल्या मात्र तोडगा निघाला नाही. यावरून विचार करा त्या दोन ग्रामस्थांची किती अपमान केला असेल त्या यादव बाईने, बर दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत, जर प्रतिनिधींसोबत अशी वागणूक देत असेल तर गोरगरिबांच्या विचारच करू नका.
मूर्तिजापूर पंचायत समितीचा असाच बधिर अधिकारी आहे, ज्याला भाऊच्या शिव्या खाव्या लागल्या होत्या तोपण सुधारणार नाही, जनतेला तुच्छ वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांची लिस्ट महाव्हाईस न्यूज च्या हाती लागल्याने आता त्यांची पोलखोल करण्याचे काम करणार आहे. अनेक नागरिकांच्या तोंडी तक्रारी तर काहींनी लेखी तक्रारी करून सुद्धा या मुजोर अधिकाऱ्यांना धारेवर आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कोणतं मोठं पाऊल उचलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…