Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई…अनभोरा येथून १८ किलो गांजा जप्त…

मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई…अनभोरा येथून १८ किलो गांजा जप्त…

मूर्तिजापूर, नरेंद्र खवले

मूर्तिजापूर : गांजाची वाढती तस्करी लक्षात घेता मूर्तिजापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अनभोरा येथून 18 किलो गांजा सह एका आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मण ऊर्फ सोनू बाबाराव मोहिते असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून हस्तगत केलेल्या गांच्याची अंदाजे किंमत 1 लाख 80 रुपये पर्यंत सांगण्यात येत आहे.

दिनांक 4/12/2023 रोजी 13/00 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते वय 23 वर्ष राहणार अनभोरा याचे राहते घरी जाऊन घर झळती घेतली असता आरोपीचे राहते घरी 18 किलो 12 ग्राम गांजा मिळून आला किंमत अंदाजे 1,80,120/- रुपयाचा मिळून आला आहे आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस स्टेशन मुर्तीजापुर ग्रामीण अप नंबर 401/2023 कलम 20 ब एन डी पी एस ऍक्ट नुसार गुन्हा करण्यात आला आहे.

सदर कारवाई, पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब अकोला, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनोहर दाभाडे साहेब मुर्तीजापुर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मुर्तीजापुर ग्रामीण श्री सुरेंद्र राऊत व पीएसआय सुनील नवलाखे पोलीस स्टाफ विजय मानकर, गोलंदाज लांजेवार, अनिल टोपकर, संजय खंडारे, मनीष मालठाने, शंकर खेडकर, गणेश ठाकरे, घनश्याम सलामे, चालक इरफान अली, महिला कॉन्स्टेबल वर्षा धारपवार यांनी सहकार्य केलं.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: