मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीपूर्वीच रंगत वाढली आहे. तर भावी आमदारांनी आतापासूनच प्रचार सुरु केला आहे. काही मागील 2019 च्या निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि ज्यांनी निवडणुकीत चांगले मतदान घेतले तेही. अश्यातच शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष/पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने विदर्भात व महाराष्ट्रात काही ठिकाणी विधानसभा निवडणूकीत उमेदवार रिंगणात उतरणार अशी माहिती जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुरेशभाऊ जोगळे यांच्या कडून माहिती मिळाली.
महिला सशक्तीकरणासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले, मात्र हे 2024 च्या नंतरच्या निवडणुकीसाठी लागून होईल त्यापूर्वी महिलांनाही या लोकसभेत, विधानसभेत स्थान मिळाव यासाठी मूर्तिजापूर विधानसभा मतदार महिला उमेदवार देण्याचा मानस शेतकरी संघटनेचा आहे. तर जिल्ह्यात शेतकरी संघटनेशी बरीच लोक जुळले असल्याने त्यांचे मतदार निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडतात. याबाबत शेतकरी संघटनेच्या नेत्या व स्वतंत्र भारत पार्टीच्या महीला आघाडी अध्यक्षा मा. श्रीमती सीमाताई नरोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा काही ठिकाणी विधान सभा निवडणूकीत उमेदवार रिंगणात असतील अशी माहिती दिली अणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्ष/पार्टी चे यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांनी सुद्धा लवकरच महाराष्ट्र दौरा करून व सर्व शेतकरी, शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष/ पार्टी च्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून लवकरच उमेदवार यांची चाचपणी करुन ज्या मतदार संघात ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार रिंगणात असतील हे निश्चित.
मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत महीला उमेदवार रिंगणात उतरणार अशी माहिती जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हा अध्यक्ष यांनी दिली.याबत लवकरच पुढीप्रमाणे माहिती घेऊन उमेदवार यादी/चाचपणी सुरू झाली आहे. असे शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष/पार्टी च्या वतीने अधिकृत माहिती मिळाली. जर शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष/पार्टी ने मुर्तिजापूर विधानसभा मतदासंघातील चित्र वेगळे असणार आहे.