Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमिरज मधील खुनाचा गुन्हा २४ तासात उघड, एकास अटक, स्थानिक गुन्ह्ये अन्वेषण...

मिरज मधील खुनाचा गुन्हा २४ तासात उघड, एकास अटक, स्थानिक गुन्ह्ये अन्वेषण शाखेची कारवाई…

सांगली – ज्योती मोरे

मिरज शहरात काल झालेल्या ऋषिकेश बाळासाहेब जाधव. वय 19 वर्षे, राहणार घोरपडे वाडा, कमान वेस मिरज याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात गंभीर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याबाबतीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून आज दीपक संजय हलवाई व 19, राहणार मंगळवार पेठ, कोष्टी गल्ली मिरज यास अटक केली असून त्याने दारूच्या नशेत झालेल्या वादाचा राग मनात धरून सदर खून केल्याचे कबूल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की खुनाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास खास बातमीदाराकरवी सदरचा खून हा दीपक संजय हलवाई व त्याचा मित्र अक्षय पिसाळ यांनी केला असून,त्यापैकी संजय हा अंकली गावच्या हद्दीत भगाटे यांच्या शेताजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली.मिळाल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून दीपक हलवाई यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा खून हा ऋषिकेश जाधव यांच्याबरोबर दारूच्या नशेत झालेल्या वादाचा राग मनात ठेवून डोक्यात दगड घालून केल्याचे त्याने कबूल केले आहे.सदर गुन्ह्याच्या तपास कमी दीपक हलवाई याच ताब्यात घेतले असून मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार,दीपक गायकवाड,चेतन महाजन, सुनील लोखंडे, संदीप नलवडे, हेमंत ओमासे, प्रशांत माळी, सचिन धोत्रे, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, आर्यन देशिंगकर, कॅप्टन गुंडवाडे,प्रकाश पाटील आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: