Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअनधिकृत बांधकामाची नोटीस देऊन महानगरपालिका सायलेंट मोडवर; संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची अमरजीतसिंघ...

अनधिकृत बांधकामाची नोटीस देऊन महानगरपालिका सायलेंट मोडवर; संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची अमरजीतसिंघ गिल यांची मागणी…

अनधिकृत बांधकामाची नोटीस देऊन महानगरपालिका सायलेंट मोडवर; संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची अमरजीतसिंघ गिल यांची मागणी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

गुरुद्वारा गेट नंबर सहा परिसरातील शहिदपुरा भागात होत असलेले अनधिकृत बांधकाम विरोधात महानगरपालिकेने प्रादेशिक नगररचना अधिनियमात अंतर्गत कलम 53 व 54 ची नोटीस देऊन कारवाई मात्र करण्यास धजावत नसल्याने मनपा सायलेंट मोडवर गेल्याचे बोलल्या जात आहे.

महानगरपालिकेच्या वजीराबाद क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येत असलेले शहिदपुरा भागातील मनोहरसिंघ फत्तेसिंघ मल्होत्रा यांचे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 अन्वये नोटीस दिली आहे. नोटीस देऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी या बांधकामा विरोधात कारवाई मात्र केली नसल्याचे दिसत आहे. यामानुसार नोटीस दिल्याच्या एक महिन्यानंतर संबंधित धारकावर पोलीस कारवाई करणे आवश्यक आहे.

यावर कहर म्हणजे कायदेशीर नोटिसीला केराची टोपली दाखवून मालमत्ता धारकाने बांधकाम सुरूच ठेवले असून पाडण्याची कारवाई तर दूरच राहिली असल्याने अमरजीतसिंघ पंजाबसिंघ गिल यांनी सहाय्यक आयुक्त वजिराबाद यांच्याकडे सदर बांधकाम तात्काळ पाडून नियमाची अंमलबजावणी करावी अन्यथा त्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नगरचना अधिनियम 1966 अन्वये दोन नोटीस देऊनही मालमत्ताधारक कामे काम रोखले नसल्याने महानगरपालिकेची मालमत्ता धारकास कोणतीही धास्ती नसल्याने कायद्याचे गांभीर्य बद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: