अमरावती – पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या आणि टेकड्या हे महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे ही बाब डोळ्यासमोर ठेवून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला यंदा १० जून रोजीचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला असून, आपल्या ६५ व्या वाढदिवशी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात ६५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. या संकल्पात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक कार्यासाठी समर्पित करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. यंदा नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपला वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला आहे.
अमरावती महानगरपालिकेने शहराच्या विविध भागात ६५ वृक्ष लावून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यामध्ये पावसाळ्याचे तोंडावर टप्प्यात टप्प्यात प्रत्येक नागरिकांनी अमरावती शहरातील महत्वाच्या उजाड टेकड्या आदी भागामध्ये टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे पंचवट वड, चिंच,पिंपळ,आंबा, जांभूळ, कडुलिंब असे वृक्ष लावण्यात आले तसेच, त्यांचे जतन करुन, त्याच्या वाढीसाठी सर्वप्रकारचे नियोजन करण्यात येत आहे, यासाठी वन विभागाचेही सहकार्य घेण्यात येत आहे.
कॉलनी, वस्ती देवस्थाने येथे मोठया प्रमाणात उन्हाळ्यात दुचाकी, चारचाकी गाड्या लावण्यासाठी सावली शोधावी लागते, सततची वृक्ष तोड त्याप्रमाणात वृक्ष संगोपन न होणे यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहे. यामुळे ‘कुटुंब वतसासलंम असलम कुटुंब वत्सलम’ संकल्पाने नुसार सर्व प्राणी मात्रासह आपल्या मानव जातीच्या सुखकर जीवनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे आवश्यकच आहे.त्यामुळे अमरावतीकरांचे उद्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.