Tuesday, December 3, 2024
Homeराज्यराष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्द मुनगंटीवार यांनी मानले मतदारांचे आभार…

राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्द मुनगंटीवार यांनी मानले मतदारांचे आभार…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य बाजावताना दाखविलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘निकालाची चिंता न करता गोरगरिबांच्या कल्याणासाठी आजपर्यंत निवडणूक लढविली. नेहमीप्रमाणे यंदाही विकासाचा संकल्प घेऊन जनतेशी संवाद साधला. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. अस्मानी संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो. संवेदनशील जनतेने प्रचारादरम्यान मला भरभरून आशीर्वाद दिलेत.

आज मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्‍या. राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्‍या या उत्‍सवात उत्‍स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही चंद्रपूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी चंद्रपूर जिल्ह्यातील मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो, अशा भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

जनसेवा कायम राहणार

निवडणुकीतील विजय आणि पराजयाच्या पलीकडे जाऊन भाजपाने कायम जनतेची सेवा केली आहे व यापुढेही ही जनसेवा आम्‍ही निरंतर करत राहू. भाजपा-महायुतीच्‍या माध्‍यमातून हा सेवायज्ञ आम्ही असाच पुढे नेणार आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: