Saturday, December 21, 2024
HomeBreaking NewsMumbai | महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने खळबळ...पोलिसांनी हत्येचा केला उलगडा...

Mumbai | महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने खळबळ…पोलिसांनी हत्येचा केला उलगडा…

Mumbai : कुर्ला येथील मेट्रोच्या बांधकाम साईटवर सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेहाचं आढळल्याने खळबळ उडाली होती मुंबई पोलिसांनी या महिलेचा तपास करीत महिलेच्या हत्येच गूढ उकललं आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सी. एस टी. रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एका सुटकेसमध्ये महिलेच मृतदेह सापडला होता. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत होती. पोलिसांनी राजावाडी रूग्णालयात मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. महिलेने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संबंधित महिला धारवी येथे राहणारी होती. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने ही हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचा संशय पोलिसांन आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून सदर महिला ही धारावी परिसरातील राहणारी आहे. गुन्हे शाखा कक्ष 5 ने महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे.

महिलेचा मृतदेह ज्या सुटकेस बॅगेत आढळला पोलिसांनी पुढील तपास सुरू केला होता. दोघे किती वर्षापासून एकत्र होते? हत्येचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिस करत आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधील खुनांच्या गुन्ह्यात वाढ लिव्ह इन रिलेशनशिपमधील खुनांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र अलीकडच्या घटनांनंतर समोर येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: