मुंबई : मुंबईच्या रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिवसाढवळ्या दोन जणांनी मृत्यूला कवटाळले. या दोघांची ओळख पिता-पुत्र अशी झाली आहे. दोघेही एकत्र रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि ट्रेन येताना पाहून रुळावर आडवे झाले. भरधाव वेगात असलेली ट्रेन दोघांच्याही अंगावरुन गेली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटे आलेत.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. वसई पूर्वेला असलेल्या या रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी दोघे पिता-पुत्र आत्महत्या करताना दिसले. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वडिलांचे वय 60 वर्षे तर मुलाचे वय 30 वर्षांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोघेही बोलत असताना स्टेशनभोवती फिरत आहेत. मग दोघेही स्टेशनवरून खाली येतात आणि रुळ ओलांडू लागतात. दरम्यान, दुसऱ्या ट्रॅकवर ट्रेन येत असल्याचे पाहून दोघेही रुळावर आडवे झाले. मग ट्रेन त्यांच्यावर चढते आणि पुढे जाते.
वडिलांच्या खिशात सुसाईड नोट सापडली
मात्र, दोन्ही पिता-पुत्रांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची वसई जीआरपीने आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. वडिलांच्या खिशात सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात लिहिलं आहे की, आम्ही आमच्या मर्जीने ही पावलं उचलत आहोत आणि आमच्या मृत्यूसाठी आम्ही कोणाला दोष देत नाही.
चालकाने ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला
भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर सोमवारी सकाळी 9 वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन जवळ येताच दोघेही रुळावर पडले. त्याला खाली पडलेले पाहून चालकाने ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. भरधाव वेगामुळे या दोघांच्या अंगावर गाडी आदळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोरोनामध्ये पत्नी गेली
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, 60 वर्षीय व्यक्तीने कोरोना महामारीच्या काळात पत्नी गमावली होती. त्यांच्या मुलाने सहा महिन्यांपूर्वी प्रेयसीशी लग्न केले. सासरे आणि पतीच्या मृत्यूने महिलेलाही धक्का बसला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Father-Son suicide at Bhayandar Railway Station in Vasai East, Mumbai#TrendingNews #MumbaiLocal pic.twitter.com/p9X1YEAdPD
— Sakshi (@sakkshiofficial) July 10, 2024