Friday, November 22, 2024
HomeBreaking NewsMumbai RBI | मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब लावल्याची आरबीआयला धमकीचा मेल…

Mumbai RBI | मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब लावल्याची आरबीआयला धमकीचा मेल…

Mumbai RBI : मुंबईवर पुन्हा बॉम्बस्फोट होणार असल्याचा RBI ला धमकीचा मेल आला आहे. सोबतच गव्हर्नर शक्तीकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला मंगळवारी बॉम्बची धमकी देणारा मेल प्राप्त झाला. मुंबईत आरबीआय कार्यालये, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह ११ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आले असून दुपारी दीड वाजता स्फोट होणार असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे.

वृत्तसंस्था ANI नुसार, मेलमध्ये लिहिले आहे, “आम्ही मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 वेगवेगळे बॉम्ब ठेवले आहेत. RBI ने खाजगी क्षेत्रातील बँकांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात RBI गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, काही उच्चपदस्थ वित्त अधिकारी आणि भारतातील काही प्रसिद्ध मंत्री सामील आहेत. यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत.” हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने खिलाफत इंडियाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी या सर्व ठिकाणी जाऊन तपास केला मात्र काहीही सापडले नाही. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मेलमध्ये बॉम्ब ठेवलेल्या तीन ठिकाणांचा उल्लेख केला आहे:
आरबीआय फोर्टची नवीन केंद्रीय कार्यालयाची इमारत,
एचडीएफसी हाऊस चर्चगेट,
आयसीआयसीआय बँक टॉवर्स बीकेसी.

मेलमध्ये पुढे लिहिले आहे की, “आम्ही मागणी करतो की RBI गव्हर्नर आणि अर्थमंत्री या दोघांनीही आपल्या पदांचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि घोटाळ्याचा संपूर्ण खुलासा करून एक प्रेस स्टेटमेंट जारी करावे. या दोघांना आणि घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांना सरकारने योग्य ती शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे. दुपारी दीड वाजेपूर्वी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एक एक करून सर्व ११ बॉम्ब फुटतील.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लगेचच मुंबई पोलिसांनी कारवाई केली आणि सर्व ठिकाणी व्यापक शोध घेतला. मात्र, झडतीमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. या घटनेबाबत एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: