अकोल्याच्या डॉक्टर तारा माहेश्वरी यांना दिवंगत गुंफाई ग्यानेश्वर वाघमारे स्मृति जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमरावतीचे एकनाथ महाराज क्षीरसागर यांना स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई – सद्गुरु इंटरप्राईजेस तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आयोजित, क्यूबिल्डकॉन,आपले कल्चर एग्रीकल्चर, आणि दातार अभिनव फिल्म क्रिएशन प्रस्तुत कॉटन सिटी अवॉर्ड यामध्ये,एक्सएलसी, आंतरराष्ट्रीय फिल्म, कलागौरव, जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मुंबई येथे करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याला माननीय खासदार राहुल शेवाळे, विशाल परदेशी उपसंपादक आयबीएन लोकमत,तीक्ष्णगत वाघमारे,सीएमडी सुपर ग्रुप,सुभाष गवई चित्रपट निर्माते, स्मिता चौधरी,जगताप मॅडम, चंद्रकांत विसपुते, प्रामुख्याने उपस्थित होते.तर विदेशातून आलेल्या पाहुण्यांमध्ये रेनॉल्ट फ्रान्सिसको जर्मनी,जॉय इटली, रॉबीन जर्मनी, इत्यादी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून गणेश वंदना करण्यात आली.
त्यानंतर भारतातल्या विविध राज्यातून व विदेशातून आलेल्या निवडक पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सर्वप्रथम अकोल्याच्या डॉक्टर तारा माहेश्वरी यांना दिवंगत गुंफाई ग्यानेश्वर वाघमारे स्मृति जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि अमरावतीचे एकनाथ महाराज क्षीरसागर यांना स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कला क्रीडा साहित्य राजकारण समाजकारण उद्योजक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल एक्सलन्सी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यामध्येअनिकेत कोकाटे,सुमेध आंभोरे,प्रशांत जैन, विठ्ठल माळी,सदशिव ढेंगे, तेजेस वानखेडे, वर्षा कळके,दरश विशे,पूर्वा बागलेकर,नितीन धावणे पाटील,विशाल धुमाळ, प्रार्थना भट, यांचा समावेश आहे. तर कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल कलागौरव सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.यामध्ये प्रसिद्ध अभिनेते गिरीश परदेशी, अनिल सूर्या, शाम क्षीरसागर, संतोष साखरे, हेलन फ्रान्सिसको, मोती सुलतानपूरी, सुनील गोडबोले, उमेश जगताप, उमेश बोडके, महेश लोहार, प्रशांत खिल्लारे, राजेश चिटणीस, विक्रांत ठाकरे,
सोनाली सोनवणे,हेमंत नारकर, संदेश गौर, यांना सन्मानित करण्यात आले. तर आंतरराष्ट्रीय चित्रपट डॉक्युमेंटरी फिल्म वेब सिरीज शॉर्ट फिल्म सिरीयल या कॅटेगरीतील विविध पुरस्कारामध्ये एकूण 40 पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर जुरी अवार्ड विशेष पुरस्काराने हिंदी चित्रपट “अभिनय का अभिनंदन” या हिंदी चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता अभिनव दातार व उत्कृष्ट निर्माता संजय दातार यांना देण्यात आला.
तर उत्कृष्ट शॉर्ट फिल्म साठी “ऑक्सिजन” या लघुपटाच्या निर्मात्या सुरेखा गावंडे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या तर उत्कृष्ट शॉर्ट फिल्म “नो कॅप्शन” चे दिग्दर्शक प्रवीण हटकर यांना देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्याला. आयोजक प्रशांत मानकर, मोहन दास,सचिन निंबोकार,सुनील शिरसाट,राजेश मानकर, रवी चव्हाण, पंकज सहगल यांनी परिश्रम घेतले.